Job Costing मधून Exact Profit कसा काढायचा? — Advanced Calculation

हे वाचण्याआधी जर तुम्ही job costing नवीन शिकत असाल, तर आधी [Topic 11 — Job Costing Sheet Basics] वाचा. इथे आपण त्याच पायावर पुढची, जास्त अचूक पद्धत बघणार आहोत.
Printing press profit calculation dashboard with job costing formula including paper, ink, machine and labour cost

Topic - 21

Printing Job Costing System - खरा Profit कसा Calculate करायचा?

           मागच्या महिन्यात 50 orders होते. Machine दिवसभर बंद पडली नाही. Staff वेळेवर होता. आणि तरीही महिना संपल्यावर account मध्ये बघितलं तर — खूप कमी उरलं होतं. हे तुमच्यासोबत झालंय का?

असं होण्याचं कारण orders कमी नाहीत — costing system नाही.

Printing job costing system म्हणजे साध्या भाषेत: प्रत्येक job साठी paper ते delivery पर्यंत नक्की किती खर्च झाला, किती wastage गेला, machine किती वेळ चालली, labour किती लागला — हे सगळं एकत्र करून "या कामातून खरोखर किती नफा मिळाला?" हे ठरवणे, बस एवढंच.

हे system नसेल तर तुम्ही अंदाजावर business चालवत आहात. आणि अंदाजाने चालणारा business — कधी ना कधी अडखळतोच.


Costing का Fail होते? — बहुतेक Presses मध्ये हेच होतं.

सरळ सांगतो — printing मध्ये costing fail होण्याची कारणे technically कठीण नाही तर ती सवयींमध्ये आहेत.

  • Paper cost अंदाजाने सांगतात — actual weighing नाही
  • Ink cost 'थोडाच असतो' म्हणून सोडून देतात.
  • Machine किती वेळ चालली याचा कुठेही record नाही.
  • Labour fixed आहे म्हणून per-job मध्ये count करत नाहीत.
परिणाम काय? Turnover वाढतो, machine busy असते , पण महिना संपल्यावर profit कुठे गेला ते कळत नाही. हे mystery नाही, हे missing data आहे.

📌 हे आधी वाचा: Topic 09 – Printing Costing Formula Basics 
👉https://kraj008.blogspot.com/2026/02/printing-press-profit-growth.html

Printing Job Costing मध्ये कोणते 6 घटक असतात?

एका perfect costing system मध्ये खाली दिलेले सहा components असतात. यातला एकही ignore केला तर final number चुकतो — आणि मग rate पण चुकतो.
1. Paper Cost — सर्वात मोठा, सर्वात जास्त ignore होणारा
Paper हा printing मधला सर्वात मोठा variable cost आहे. पण बहुतेक लोक फक्त वापरलेला paper count करतात, wastage विसरतात, ती चूक करू नका.
Paper Cost = (वापरलेला Paper + Wastage)× Rate per kg.किंवा sheet

2. Plate / Design Cost
Plate making चा खर्च directly त्या job ला assign करा. Design घरातच केला असेल — म्हणजे खर्च नाही असं नाही. त्या वेळेचा cost आहे. तो include करा, नाहीतर तुम्ही स्वतःला फुकट काम देत आहात.

3. Ink Cost — सर्वात जास्त दुर्लक्षित
'थोडाच असतो' हे excuse आहे. 4-colour jobs मध्ये ink cost 5% ते 8% पर्यंत जाऊ शकतो. Simple method: प्रति 1000 impressions ink cost define करा, आणि तो थेट job वर लावा. एकदा rate fix केला की पुढे automatic होतं.

4. Machine Cost — Hidden Profit Killer
Machine चालवणं म्हणजे फक्त current bill नाही, Electricity, Annual maintenance, आणि Depreciation, तिन्ही मिळून खरा machine cost येतो. हे calculate न केल्यास प्रत्येक job underpriced जातो.

Machine Cost per Job  =  Hourly Rate  ×  Job ला लागलेले तास

5. Labour Cost
Operator, helper, binding staff — सगळ्यांचा monthly salary घ्या, working hours ने divide करा, आणि per-hour rate काढा. मग प्रत्येक job किती तास चालला त्यावर multiply करा. Fixed salary असली तरी per-job cost निघतोच.

6. Overhead / Indirect Costs
Rent, admin, transport, miscellaneous  हे थेट दिसत नाहीत पण असतात. Total monthly overhead घ्या आणि working days ने divide करा. त्या दिवशी झालेल्या jobs मध्ये proportionate share द्या. Simple, पण खूप कमी जण करतात.


Core Costing Formula — एकदा लक्षात ठेवा, कायम वापरा

हे सहाही components एकत्र आले की एकच formula निघतो:

Total Job Cost  =  Paper + Plate + Ink + Machine + Labour + Overhead

Profit  =  Client Billing  –  Total Job Cost

Profit %  =  ( Profit ÷ Billing )  ×  100

 हे तीन numbers माहित असणे म्हणजे तुमचा business तुमच्या हातात असणे. नाहीतर business तुम्हाला 
 चालवतो , तुम्ही त्याला नाही.     

Real Example — 10,000 Brochures ची Exact Costing

Theory कळली, पण practical बघणं जास्त उपयोगी असतं. हे घ्या एक actual job:

Job: 10,000 Brochures — A4 size, 4 colour, single side

Component

Cost (₹)

Paper (A4, 80gsm — 10,000 sheets)

18,000

Plate Making (4 colours)

2,000

Ink

1,500

Machine Time

3,000

Labour (operator + helper)

2,500

Overhead Share

1,000

एकूण Total Cost

28,000

 

Client Billing: ₹35,000    |    Profit: ₹7,000    |    Margin: 20%


हे numbers तेव्हाच दिसतात जेव्हा प्रत्येक line item track केलेली असते. अंदाजाने हे शक्य नाही. कारण अंदाजात wastage, machine idle time, आणि overhead कधीच नीट capture होत नाहीत.


Wastage Ignore केल्यावर काय होतं? — Numbers बघा.

Printing मध्ये wastage तीन ठिकाणी येतो: Makeready, Colour adjustment, आणि Cutting. आणि बहुतेक वेळा तो "नॉर्मल आहे" म्हणून account मध्ये येत नाही.

  • Acceptable wastage range: 3% ते 7% (job type नुसार),
  • जर wastage 5% ऐवजी 12% झाला  Profit थेट 30% ते 40% कमी होतो.
  • Makeready paper हा सर्वात controllable wastage आहे → इथून सुरुवात करा.

↳ Topic 12 — Reprint आणि Wastage का वाढतो? Complete Analysis
https://kraj008.blogspot.com/2026/03/printing-press-reprint-wastage.html

Machine Time Track का करायचं? — हे Skip करणे महागात पडतं

Machine किती वेळ चालली आणि किती वेळ idle राहिली,  हे दोन्ही track न केल्यास machine cost नेहमी कमी calculate होतो. Idle time म्हणजे पैसे जातायत पण production होत नाही. तो पण cost आहे.

उपाय एकदम simple आहे: →प्रत्येक job साठी start time आणि end time एका sheet मध्ये note करा.  

दोन आठवड्यात pattern कळेल,  कुठला job जास्त वेळ खातो, कुठे machine थांबते.

↳ Topic 19 — Job Tracking System: Simple Method for Printing Press:  https://kraj008.blogspot.com/2026/04/printing-job-tracking-system-manual.html


सही Rate कसा ठरवायचा? ↔ Costing शिवाय Rate म्हणजे Guess.

Client किंमत कमी करायला सांगतो  आणि आपण देतो  का? कारण आपल्याला माहित नसतं की "खाली" किती जाता येतं. Costing माहित असेल तर negotiation मध्ये confidence येतो.

Ideal Rate  =  Total Job Cost  +  ( Total Job Cost × Desired Profit % )

Example: Cost = ₹28,000, Profit target = 25% → Rate = ₹35,000. हे आधी माहित असेल तर client ₹32,000 ला मागतो तेव्हा तुम्हाला कळतं की 'हे Possible आहे पण Margin Tight होईल.'


Topic 04 — Client Rate Negotiation: Low Rate वर Pushback कसा द्यायचा?https://kraj008.blogspot.com/2026/01/client-rate-printing-to-z-marathi.html

Topic 07 — Cash Flow Problem: Turnover असताना पैसे कमी का वाटतात?https://kraj008.blogspot.com/2026/01/printing-press-cash-flow-printing.html


Low Rate Jobs चा Trap → Machine Busy, Profit Zero.

हे Situation खूप dangerous आहे कारण यात सगळं 'ठीक' वाटतं  Machine चालू आहे, Staff काम करतोय, Orders येतायत. पण खाली काय होतं?

  • Cash येतो पण cost cover होत नाही.
  • Profit zero किंवा काही jobs मध्ये actual loss.
  • Long-term मध्ये machine maintenance साठी पैसे नसतात.
हा Trap ओळखायचा एकच मार्ग आहे  costing system. प्रत्येक ?Job चा Profit % माहित असेल तर कोणता job घ्यायचा आणि कोणता नाही हे data ठरवतं, Gut feeling नाही.

 Job Costing Sheet .. Simple Setup, मोठा फरक.

खूप fancy करायची गरज नाही. Google Sheet मध्ये हे columns ठेवा  आणि daily entry करा बस:
  • Job ID + Client Name + Delivery Date.
  • Paper Used (kg) + Wastage %
  • Machine Start / End Time.
  • Labour Hours.
  • Total Cost vs Billing vs Profit %
एकदा हे 2-3 आठवडे Consistently केलं की Patterns दिसायला लागतात. कोणते clients कमी profit देतात, कुठले job types efficient आहेत  सगळं clear होतं.

↳ Topic 11 — Job Costing Sheet कशी बनवावी? (Free Template)
https://kraj008.blogspot.com/2026/03/printing-press-job-costing-sheet-2026.html  


️Manual vs Digital System →तुमच्यासाठी काय योग्य?

तिन्ही options मध्ये एक best नाही, Press च्या size आणि stage नुसार निवड बदलते:

पद्धत

फायदा

मर्यादा

कागद + पेन (Manual)

कुठेही, कधीही  Zero cost.

चुका होतात, Scale होत नाही.

Excel / Google Sheet.

Formula accurate, free आहे.

पहिल्यांदा setup वेळ लागतो.

ERP / Software

Real-time data, Automated.

Cost जास्त, Training लागते.

   

Recommendation: जर नुकतंच सुरू करतोय, Google Sheet + Daily manual entry हे best आहे. Data येऊ लागल्यावर automation add करता येतो.


Owner च Bottleneck बनतो जेव्हा  "System नसेल तर"

Costing system नसेल तर प्रत्येक rate decision, प्रत्येक job quote, प्रत्येक client negotiation — owner वर येतं. त्याला पर्याय नाही कारण data कुठेच नाही.

System बनवलं तर काय होतं? Staff standard rates बघून quote देऊ शकतो. Decisions faster होतात. Owner वेळ मिळतो business grow करायला  रोजच्या Operations मध्ये अडकण्याऐवजी.

↳ Topic 10 — Owner Bottleneck: तुम्हीच कुठे अडलेलो आहात?
https://kraj008.blogspot.com/2026/02/printing-press-owner-bottleneck.html

Profit वाढवण्यासाठी 5 Rules — Practical, आत्ताच वापरता येतील

  1. Paper wastage control करा — सर्वात direct profit impact येथून येतो.
  2. Machine idle time record करा — efficiency कुठे जाते ते कळेल.
  3. Low margin jobs consciously नाकारा — busy असणे profitable असणे नाही.
  4. Standard costing template बनवा — प्रत्येक job साठी consistent calculation.
  5. Data वर decisions घ्या — 'वाटतं' वर नाही.

Step-by-Step Setup Plan — आजपासून सुरू करायचं असेल तर

      6.  Step 1 — सर्व fixed आणि variable costs एका list मध्ये लिहा.

      7.  Step 2 — Machine hourly cost calculate करा: Monthly खर्च ÷ Monthly working hours.

      8.  Step 3 — Labour Per-hour cost ठरवा.

      9.  Step 4 — Google Sheet template तयार करा (simple columns — 15 मिनिटांत होतं)

    10.  Step 5 — Daily job entry सुरू करा — consistently

     11.  Step 6 — दर आठवड्याला profit analysis करा, loss jobs identify करा


🔚 Conclusion

Printing business मध्ये success हा किती orders येतात यावर नाही,  किती orders profitable आहेत यावर अवलंबून असतो. हा फरक costing system शिवाय कळत नाही.

Job costing system एकदा लागू केल्यावर Loss jobs दिसतात, Rate negotiate करताना Confidence येतो, आणि business systematically grow होण्यास जागा मिळते. यासाठी मोठं software नाही लागत,  एक Google Sheet आणि daily 10 मिनिटे पुरतात सुरुवातीला.

अंदाजाने चालणारा press आणि data वर चालणारा press — दोन्ही busy दिसतात. पण एकच पुढे जातो.


⏳FAQ — वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. Printing job costing manually करता येतं का?

हो — येतं. पण error होण्याची शक्यता जास्त असते आणि रोज consistent राहणं कठीण जातं. Google Sheet हा सर्वात practical starting point आहे: free, formula-based, आणि mobile वर पण access होतं.

Q2. Machine cost नक्की कसा calculate करायचा?

Simple method: त्या machine वर महिन्याला होणारा एकूण खर्च (Electricity + Maintenance + Depreciation) घ्या आणि महिन्यातील actual working hours ने divide करा. हा per-hour rate प्रत्येक job वर apply करा.

Q3. Minimum profit margin printing मध्ये किती असावा?

Industry experience सांगतो की 20% ते 30% हा healthy range आहे. यापेक्षा कमी असेल तर overhead cover होत नाही आणि machine replacement साठी पैसे जमत नाहीत.

Q4. Wastage किती acceptable आहे?

3% ते 7% हा normal range आहे — paper type, machine, आणि job complexity नुसार vary होतो. 10% च्या वर गेला तर process मध्ये काहीतरी चुकतंय,  investigate करा.

Q5. Costing system लागू केल्यावर profit किती सुधारतो?

Case-to-case बदलतं, पण common observation आहे की systematic costing सुरू केल्यावर 15% ते 40% profit improvement होतो — मुख्यतः wastage control आणि low-margin jobs eliminate केल्यामुळे.



↳ Topic 25 - Machine Efficiency कशी वाढवावी? Printing Press मध्ये 20-30% Boost System.

https://kraj008.blogspot.com/2026/06/machine-efficiency-printing-press-20-30.html


🔗Next Topic 

Paper Cost Control System (Hidden Loss कसा थांबवावा?)


📌 Bookmark करा.

📌 दर रविवारी नवीन लेख-

       🤝 अनुभवी सल्ला हवा आहे?  

  Comment मध्ये फक्त लिहा: “GUIDE”

 

📣 ज्ञान वाटलं तरच वाढतं — Share करा.

 


Comments

Popular posts from this blog

Paper Cost Control : Basic Introduction

Free Printing Cost Calculator India (2026) – Costing + Quotation sheet

प्रिंटिंग व्यवसायात नवशिक्यांनी केलेल्या 10 मोठ्या चुका.