Client Rate कमी करा म्हणाल्यावर काय करायचं?

 

Printing press owner discussing pricing and rate negotiation with client in offset printing business

  Topic - 4

इतर  प्रेस वाले कमी Rate कमी मध्ये करून देतात?   

(Real Conversations सहित)

Introduction:

प्रिंटिंग प्रेसमध्ये एक वाक्य सर्वात जास्त ऐकायला मिळतं “Rate थोडा कमी करा ना…” हे वाक्य ऐकून अनेक प्रेस मालक घाबरतात लगेच Rate कमी करायला तय्यार होतात, आणि नंतर नफ्याबद्दल तक्रार करतात माझ्या 30+ वर्षांच्या अनुभवात मी एक गोष्ट शिकलो
👉 Rate Negotiation हा Math चा नाही, Communication चा खेळ आहे. आज आपण प्रत्यक्ष संभाषणांच्या उदाहरणातून हे समजून घेऊया.


1️Client Rate का कमी करायला सांगतो? (मूळ कारण)

Client नेहमीच Rate कमी करायला सांगतो असंनाही, पण बहुतेक वेळा कारण असतं: त्याला costing समजत नाही तो Compare करतो (खरंखोटं) तो तुमची Confidence test करतो,

📌 Rate Discussion = Trust Test


2️) Real Conversation #1 – “दुसऱ्या प्रेसवाल्याने स्वस्त दिलंय

Client: दुसऱ्या प्रेस यापेक्षा कमी Rate मध्ये देतोय, तुम्ही किती कमी करता

चुकीचं उत्तर:  ठीक आहे, आपण पण कमी करू. 👉 याने Client शिकतो इथे दर नेहमी कमी होतो.

योग्य उत्तर:  कदाचित त्यांनी हलका Paper, वेगळी Quality किंवा वेगळ्या Terms मध्ये Rate दिला असेल. आपण दोन्ही Quotation Compare करून पाहूया.

📌 तुम्ही Defensive नाही, Professional दिसता.


3️) Real Conversation #2 – “Regular काम आहे, Rate कमी करा

Client:     आम्ही Regular काम देतो, Rate कमी पाहिजे.

चुकीचं उत्तर:  ठीक आहे, चालेल.

योग्य उत्तर:  Regular काम नक्कीच महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी Quantity, Payment Cycle आणि Job Consistency Clear असावी लागते.

📌 Rate कमी करण्याआधी Conditions ठरवा.


4️) Real Conversation #3 – “Budget नाही

Client:     “Budget नाही, जसं जमेल तसं करा.

योग्य Approach: Budget Adjust करायचा असेल तर Paper, Size किंवा Finishing मध्ये काय बदल करता येतील ते पाहूया.

📌 Rate कमी करता Scope Adjust करा.


5️) Client ला Costing कसं समजावायचं? (Simple Example)

Client समोर Technical बोलू नका.

🔍 उदाहरण:

Paper = 60% , Printing + Laboure = 30% , Overheads = 10%

म्हणजे:  “Paper Rate वाढला तर Rate कमी ठेवणं शक्य नाही.

📌 Client Math समजतो, Printing नाही.


6️कधी Rate कमी करायचाच नाही? (Danger Zone)

Short Quantity
Urgent Job
Payment Delay History
High Rejection Risk job

👉 अशा कामात Rate कमी केला = तोटा ठरलेलाच.


7️कधी Rate कमी करता येतो? (Safe Zone)

Large quantity
Advance payment
Repeat design
Long-term contract

📌 पण इथेही: Rate कमी नाही, Efficiency वाढवून Margin वाचवा.


8️“No” कसं म्हणायचं? (Professional Way)

“No” म्हणणं उद्धटपणा नाही.

Example: या Quality आणि Timeline मध्ये हा Rate योग्य आहे, जर बदल हवा असेल तर Job Specification बद्दल बोलूया.

📌 Calm + Confident tone = Respect


Conclusion

Client “Rate कमी करा म्हणणं हा व्यवसायाचा भाग आहे. पण:
घाबरून Rate कमी करणं
Costing पाहता होकार देणं हे व्यवसायाला मारक आहे.

👉 योग्य शब्द, योग्य वेळ आणि योग्य Attitude यामुळेच प्रिंटिंग व्यवसाय टिकू शकतो.


👉 हा लेख वाचा Paper Cost Control – प्रेस मालकांनी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

https://kraj008.blogspot.com/2026/01/paper-cost-control-offset-printing.html  

 Offset Printing मध्ये नफा कसा वाचवायचा


🔹 Next Article (Topic No. 05)

"Digital Printing हि Offset Printing च्या तुलनेत कधी फायदेशीर ठरते?" 

हा लेख Printing A to Z Marathi मालिकेतील एक भाग आहे. पुढील भाग दर रविवारी सकाळी प्रकाशित होतो.



Client Negotiation हा अनुभवाचा खेळ आहे. जर Rate Discussion मध्ये अडचण येत असेल, तर अनुभवी मार्गदर्शन उपयोगी ठरते.

  


Comments

Popular posts from this blog

Paper Cost Control – Offset Printing मध्ये नफा कसा वाचवायचा?

प्रिंटिंग व्यवसायात नवशिक्यांनी केलेल्या 10 मोठ्या चुका.

Printing Press Cash Flow Problem: प्रिंटिंग प्रेसमध्ये पैसा का अडकतो?