Free Printing Cost Calculator India (2026) – Costing + Quotation sheet

          printing business cost calculator free excel sheet india

Printing Business मध्ये 
Cost चुकीचा Calculate केल्याने काय होतं?

Printing business मध्ये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात common चूक कोणती? Machine खराब होणं नाही, client कमी असणं नाही, rate competition नाही. सगळ्यात मोठी चूक आहे cost चुकीचा calculate करणं. माझ्या 30+ वर्षांच्या अनुभवात मी हे छोट्या आणि मध्यम printing presses मध्ये वारंवार पाहिलं आहे.

Cost चुकला की तीन गोष्टी होतात. पहिलं, pricing चुकतं: तुम्ही दिलेला quote profitable नसतो. दुसरं, profit कमी होतो: काम खूप आहे, press busy आहे, पण महिन्याच्या शेवटी हात रिकामे असतात. तिसरं, business हळूहळू loss मध्ये जातो, आणि ते दिसत नाही, पण एक दिवस अचानक crisis येतो.

यावर एकच उपाय आहे: प्रत्येक job चं accurate costing, आणि quote देण्याआधी minimum price माहीत असणं. त्यासाठी मी हा Costing + Quotation calculator Google Sheet मध्ये तयार केला आहे, भारतातील printing jobs लक्षात घेऊन.


Calculator काय करतो

तुम्ही तुमचा monthly machine खर्च आणि running hours टाकता, आणि calculator तुमचा Machine Cost Per Hour काढतो. मग प्रत्येक job साठी सहा खर्च भरता: paper, plate, ink, machine, finishing आणि transport. Wastage फक्त paper वर लागतो. त्यानंतर calculator तुम्हाला Total Cost, Minimum Selling Price आणि सुचवलेला quote देतो, आणि quote cost पेक्षा कमी असेल तर "LOSS: below cost" असा इशारा देतो.

त्याच्यासोबत तीन छोटे tabs आहेत. Quotation tab मध्ये Basic, Standard आणि Premium असे तीन options असलेला printable quotation तयार होतो. Summary tab मध्ये किती job loss मध्ये गेले आणि paper चा हिस्सा किती आहे ते दिसतं. Digital vs Offset tab मध्ये कोणत्या quantity नंतर offset स्वस्त पडतो ते कळतं. Calculator मध्ये आधीच भरलेले आकडे फक्त उदाहरण आहेत, तुमचे स्वतःचे rates टाका.

 Calculator मिळवा — Free

खाली दिलेला form एकदा भरा. Auto Quotation + Costing Calculator, Quotation Template आणि Profit Guide चे links तुम्हाला मिळतील. Google account मध्ये sign in करून "Make a copy" करा, म्हणजे calculator तुमच्या Drive मध्ये येईल, mobile वरूनही चालेल.

Click Here to Get Free Printing Cost Calculator 


Printing Cost म्हणजे नेमकं काय — सहा खर्च

Calculator वापरण्याआधी cost structure समजणं महत्त्वाचं आहे. एक खर्च जरी miss झाला तरी profit कमी होतो.

1. Paper. हा सर्वात मोठा खर्च आहे. माझ्या अनुभवात offset मध्ये paper साधारण total cost च्या 45 ते 55% असतो. Paper cost काढताना फक्त लागणाऱ्या sheets नाही, तर wastage sheets पण धरायच्या. भारत सरकारच्या BIS मार्गदर्शकानुसार (IS 12000 Part 1:2016) sheetfed offset साठी प्रत्येक colour मागे base quantity च्या 1% जादा कागद धरावा, म्हणजे 4-colour job ला 4%, आणि 3–4 colour job साठी किमान 100 sheets. तुमच्या मशीनची स्थिती आणि job नुसार हा आकडा 3 ते 8% च्या दरम्यान असू शकतो. म्हणून calculator मध्ये default 4% आहे आणि प्रत्येक job साठी बदलता येतो.

2. Plate. 4-colour job ला 4 plates लागतात. Sheetwise छापलात तर front आणि back साठी दोन forms, म्हणजे 8 plates; work-and-turn केलं तर 4 plates पुरतात. तुमचा plate चा rate टाका आणि संख्या job नुसार बदला.

3. Ink. Ink चा खर्च job च्या coverage वर अवलंबून असतो. Simple letterhead मध्ये कमी, full-bleed brochure मध्ये खूप जास्त. 4-colour job मध्ये प्रत्येक colour चा वेगळा अंदाज घ्या.

4. Machine. हा सगळ्यात जास्त चुकवला जाणारा खर्च आहे. Machine cost per hour मध्ये operator आणि helper चा पगार, electricity, EMI, depreciation, oil आणि consumables, rent चा हिस्सा आणि maintenance येतं. हे सगळं monthly जोडा आणि running hours ने भागा. उदाहरण: ₹2,40,000 ÷ 300 तास = ₹800 प्रति तास. Make-ready चे तास पण याच दराने धरायचे, कारण त्या वेळात मशीन थांबलेलं असतं पण खर्च चालू असतो. म्हणून labour वेगळा column नाही, तो machine cost मध्येच आहे.

5. Finishing. Cutting, folding, binding, lamination हे job नुसार बदलतात, म्हणून वेगळे धरा.

6. Transport. Delivery चा खर्च, जिथे लागतो तिथे.

याशिवाय एक optional Overhead line आहे: admin, office, insurance वगैरेचा monthly खर्च भागिले महिन्याचे jobs. तो तुमच्या machine cost मध्ये आधीच धरला नसेल तर इथे भरा.

Printing Cost Formula — Simple आणि Accurate

Printing job चा total cost calculate करण्याचा formula असा आहे:

Total Cost = Paper Cost + Ink Cost + Labour Cost + Electricity Cost + Overhead Allocation

आणि selling price ठरवण्याचा formula:

Selling Price = Total Cost ÷ (1 - Desired Profit Margin %)

उदाहरण: Total cost ₹1,000 आहे आणि तुम्हाला 25% margin हवा आहे. Selling Price = ₹1,000 ÷ (1 - 0.25) = ₹1,000 ÷ 0.75 = ₹1,333. म्हणजे ₹1,333 ला sell केलं तर ₹333 profit होतो — 25% margin. हे formula नेहमी वापरा — अंदाजाने quote देऊ नका.

Profit: Markup की Margin?

इथे बरेच जण गोंधळतात, म्हणून नीट समजून घ्या. "25% profit" म्हणजे 25% कशावर? Cost वर, की selling price वर? दोन्ही उत्तरं वेगळी येतात.
समजा cost ₹1,000 आहे. Cost वर 25% markup लावला तर price ₹1,250 होतं, आणि ₹250 profit म्हणजे selling price च्या 20%. Selling price वर 25% margin हवा असेल तर price = ₹1,000 ÷ 0.75 = ₹1,333, आणि ₹333 profit. फरक ₹83 चा आहे. माझ्या पुस्तकातली पद्धत markup ची आहे, आणि calculator मध्ये default तीच आहे. तुम्हाला margin वापरायचा असेल तर Settings मध्ये "Pricing method" बदला. कोणतीही पद्धत निवडा, पण नेहमी एकच वापरा.

उदाहरणे (आकडे उदाहरणादाखल आहेत)

उदाहरण 1: 8-page brochure, 3,000 copies, 4-colour. Paper (3,000 + 3% wastage = 3,090 sheets) × ₹6 = ₹18,540. Plates 4 × ₹400 = ₹1,600. Ink ₹600. Machine (3 तास + 1 तास make-ready) × ₹800 = ₹3,200. Finishing ₹1,200. Transport ₹400. Total cost ₹25,540. 20% markup म्हणजे ₹5,108, म्हणजे किंमत ₹30,648. यात paper चा हिस्सा सुमारे 73% आहे, कारण हा art paper चा paper-heavy job आहे. म्हणून तुमच्या jobs चा हिशोब तुम्ही स्वतःच करा.

उदाहरण 2: 4-colour brochure, 5,000 copies, A4, 170 GSM. Paper ₹8,500, Plate ₹800, Ink ₹1,200, Machine (operator, electricity सहित) ₹2,900, Overhead ₹800. Total cost ₹14,200. 20% markup घेतला तर किंमत ₹17,040, आणि 20% margin घेतला तर ₹17,750. म्हणजे एकाच "20%" मध्ये ₹710 चा फरक. जर तुम्ही ₹16,000 ला quote दिला तर profit ₹1,800 राहतो: किंमतीच्या 11.25%, किंवा cost च्या सुमारे 12.7%. Plate आणि overhead धरले नसतील तर हा job तोट्यात जाऊ शकतो.


Quotation: फक्त किंमत नाही

Quotation tab मध्ये तीन options असतात: Basic, Standard आणि Premium, प्रत्येकासाठी Costing sheet मधला एक job निवडा. क्लायंटला फक्त एक किंमत दिली की तो "ठीक आहे" किंवा "महाग आहे" एवढंच म्हणतो. तीन पर्याय दिले की तो "कोणता घ्यायचा" याचा विचार करतो. Scope, delivery timeline, quotation किती दिवस valid आहे आणि payment terms हे सगळं quotation वर लिहिलं की नंतर वाद कमी होतात. Quote मधली किंमत GST वगळून आहे. GST चा दर calculator मध्ये फक्त placeholder आहे. तुमच्या jobs चा योग्य दर आणि SAC/HSN code तुमच्या CA कडून तपासूनच वापरा.

सहा common Costing चुका

1. Wastage cost मध्ये न धरणं. 5,000 sheets चा job आणि 5,300 वापरल्या, तर ते 300 sheets चा खर्च profit मधून जातो. Calculator मध्ये wastage paper वर आपोआप जोडला जातो.
2. Plate cost विसरणं. 4-colour job ला 4 plates लागतात. हा खर्च miss झाला तर profit थेट कमी होतो.
3. Finishing वेगळं न धरणं. Finishing machine cost मध्ये मिसळू नका. ते job नुसार बदलतं, म्हणून वेगळं धरा.
4. Urgent job साठी जास्त न घेणं. Urgent job म्हणजे overtime, machine priority बदल आणि staff वर ताण. हा जास्तीचा खर्च आहे, म्हणून calculator मध्ये "Urgent" client type साठी जास्त profit % ठेवला आहे.
5. Proof चा खर्च. Colour proof साठी material आणि वेळ लागतो. तो खर्च तुम्ही absorb केला तर तो थेट loss आहे. Proof चा खर्च billing मध्ये धरता येतो.
6. Overhead विसरणं. Rent, salaries, telephone, internet, vehicle हे सगळं fixed खर्च आहेत. ते jobs वर वाटले नाहीत तर press नफ्यात दिसते पण प्रत्यक्षात तोट्यात असते.

Profit किती असावा?

माझ्या अनुभवानुसार starting points असे आहेत: नेहमीच्या (regular) clients साठी 15 ते 20%, नवीन clients साठी 20 ते 30% (कारण जोखीम जास्त), आणि urgent jobs साठी 25% पेक्षा जास्त. हे industry standard नाही; तुमच्या press चा खर्च, स्पर्धा आणि clients पाहून तुम्ही ठरवा. Calculator मधल्या Settings मध्ये हे आकडे बदलता येतात.

एक गोष्ट लक्षात ठेवा: एक reprint म्हणजे job चा जवळजवळ संपूर्ण खर्च पुन्हा, म्हणून कितीही margin असला तरी एका reprint ने तो संपतो. त्यामुळे reprint टाळणं हे margin वाढवण्याइतकंच महत्त्वाचं आहे. Written approval आणि wastage log यांबद्दल माझ्या इतर लेखांत वाचा.

Digital की Offset?

Digital printing साठी plate नसतो, म्हणून short runs मध्ये ते स्वस्त पडतं. Offset मध्ये setup खर्च (plates, make-ready sheets, setup time) असतो, जो quantity वाढली की पसरतो. Calculator च्या Digital vs Offset tab मध्ये दोन आकडे टाका: digital चा per-sheet खर्च आणि offset चा running खर्च आणि fixed setup खर्च. उदाहरणार्थ digital ₹5.20 प्रति sheet, offset चा running खर्च ₹3.50 आणि setup ₹1,500 असेल तर सुमारे 880 sheets नंतर offset स्वस्त पडतो. हे आकडे उदाहरण आहेत, तुमचे टाका.

Costing ने press कसा सावरला: एक उदाहरण

हे एक उदाहरण आहे; आकडे अंदाजे आहेत. एका medium offset press चा मालक अनुभवी होता. काम भरपूर होतं, पण महिन्याच्या शेवटी cash नेहमी tight असायचा. त्याने एक महिना प्रत्येक job चा detailed cost काढला आणि निकाल धक्कादायक होता: सुमारे 40% jobs मध्ये margin 8% पेक्षा कमी होता, आणि सुमारे 15% jobs तोट्यात होते. मुख्य कारण: overhead धरला जात नव्हता आणि wastage cost मध्ये येत नव्हता.
उपाय साधा होता: quote देण्याआधी cost काढायचा नियम. पहिल्या महिन्यात काही clients गेले कारण त्यांना rate जास्त वाटला. पण जे राहिले ते profitable होते. तीन महिन्यांत सरासरी margin 8% वरून 22% वर गेला, तेच काम, तेच staff, तीच machine. फक्त costing accurate झाली.

Calculator वापरताना लक्षात ठेवा

Calculator तुमच्या input वर आधारित output देतो. म्हणून पहिल्यांदा तुमच्या press चे खरे खर्च मोजा, अंदाजाने नाही. Monthly overhead आणि machine खर्च एका जागी लिहून काढा. Paper चे rates नियमित update करा, कारण ते बदलत असतात. आणि कोणत्याही client साठी cost पेक्षा कमी किंमत घेऊ नका, margin बदला, cost नाही.
Calculator कसा वापरायचा: "Make a copy" करा. Settings मध्ये machine खर्च आणि running hours टाका. Costing tab मध्ये पिवळ्या cells भरा, बाकी आपोआप येतात. Quote देण्याआधी "Minimum selling price" पाहा, आणि "Check" column हिरवा (OK) असल्याची खात्री करा.

Conclusion

Printing business मध्ये यश म्हणजे accurate cost आणि समजूतदार pricing. दोन्ही असतील तर business स्थिर राहतो आणि वाढतो. Calculator घ्या, तुमचे खरे खर्च टाका, आणि प्रत्येक job साठी quote देण्याआधी costing करा. पहिल्या काही दिवसांत वेळ लागेल, नंतर ते पाच मिनिटांत होतं, आणि ते पाच मिनिटं तुमचे हजारो रुपये वाचवतात. Profit हे luck नाही, ते system चं फळ आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. हा calculator mobile वर वापरता येतो का?
हो. Google Sheets app install करा. Calculator "Make a copy" केल्यावर तुमच्या Drive मध्ये येतो, mobile वरून उघडता येतो आणि edit करता येतो. तातडीने quote द्यायचा असेल तर आकडे टाका आणि minimum price पाहा.

2. Calculator मध्ये rates आधीच भरलेले आहेत का?
आधी भरलेले आकडे फक्त उदाहरण आहेत (एक brochure job आणि machine खर्चाचे नमुना आकडे). भारतात rates शहर, supplier आणि बाजारभावानुसार बदलतात, म्हणून तुमचे खरे rates टाका. एकदा टाकले की पुढे काम पटकन होतं.

3. Digital printing साठी वेगळा calculator हवा का?
नाही. Digital job साठी plate शून्य करा, paper च्या जागी substrate cost टाका आणि ink च्या जागी toner/click cost टाका. Digital vs Offset tab मध्ये दोन्हीची तुलना करता येते.

4. Client rate कमी करायला सांगतो, काय करायचं?
Costing नंतर तुम्हाला तुमची minimum price माहीत असते. Client त्याखाली मागत असेल तर दोन पर्याय: job चं specification बदला (कमी GSM, single colour) जेणेकरून cost कमी होईल, किंवा नम्रपणे नकार द्या. Cost पेक्षा कमी किंमतीला काम घेणं म्हणजे तोट्यात काम करणं.

5. हा calculator Excel मध्ये download करता येतो का?
हो. Google Sheets मध्ये File → Download → Microsoft Excel (.xlsx). पण Google Sheets आवृत्ती सोयीची आहे: आपोआप save होते आणि mobile वरून चालते.

GST चा दर कुठे बदलायचा?

Settings tab मध्ये "GST rate". तिथला 18% फक्त placeholder आहे. तुमच्या jobs चा योग्य दर आणि SAC/HSN code तुमच्या CA कडून तपासा.

संबंधित लेख

प्रिंटिंग व्यवसाय सुरू करायचा किंवा वाढवायचा आहे? संपूर्ण मार्गदर्शनासाठी Homepage ला भेट द्या: kraj008.blogspot.com. 


नवीन लेख miss होऊ देऊ नका, 

हा blog Bookmark करा आणि Follow करा.


Comments

Popular posts from this blog

Paper Cost Control : Basic Introduction

प्रिंटिंग व्यवसायात नवशिक्यांनी केलेल्या 10 मोठ्या चुका.