Printing मध्ये Quality Fail का होते?

Offset printing quality failure showing color variation and registration problems

Topic 06

Operator, Machine की Management? Root Cause Analysis

           Printing press मध्ये एक वाक्य नेहमी ऐकू येतं  "काम चांगलं झालं होतं, पण quality मध्ये problem आला." हे वाक्य ऐकलं की बहुतेक वेळा मशीनला दोष दिला जातो. कधी operator ला. कधी client ला  "त्यांनी सांगितलेलं बरोबर नव्हतं." पण माझ्या 30 वर्षांहून अधिक commercial printing अनुभवात मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो: quality fail होणं हे नशीब खराब असण्याचं लक्षण नाही. त्यामागे नेहमी एक किंवा अनेक specific कारणे असतात.

Quality problem ओळखणं कठीण नाही  जर तुम्ही योग्य ठिकाणी बघत असाल तर. बहुतेक presses मध्ये quality fail ची तपासणी surface level वर होते: "colour गेला, blanket खराब असेल." पण root cause analysis केली तर दिसतं की quality failure हे एका chain चा result असतो  operator पासून सुरू होते, machine पर्यंत जाते, plate पर्यंत जाते, paper पर्यंत जाते, आणि management system मध्ये संपते. या प्रत्येक link ला समजून घेणं म्हणजेच quality control आहे.


1) Operator Error – सगळ्यात जास्त दुर्लक्षित कारण

Quality problem वर दोष सगळ्यात आधी machine ला दिला जातो. पण प्रत्यक्षात बहुतेक quality failures चं मूळ कारण operator handling असतं. हे uncomfortable आहे, पण हे सत्य आहे.

Operator error तीन प्रकारे होतो. पहिला म्हणजे knowledge gap  operator ला technically काय होतंय हे माहीत नसतं. उदाहरण: colour density अंदाजाने set करणं. Densitometer वापरायचं असतं, पण training नसल्यामुळे डोळ्याने judge करतात. Result: colour variation sheet ते sheet. पहिल्या 500 sheets आणि शेवटच्या 500 sheets मध्ये visible farkness येतो.

दुसरा म्हणजे attention gap  operator ला माहीत असतं पण तो करत नाही. Dampening control हे continuous काम आहे. Machine चालू असताना दर 15-20 मिनिटांनी check करायला हवं. पण production pressure मध्ये operator हे skip करतो. Result: ink-water balance बिघडतं, text blur होतो, fine details मरतात.

तिसरा म्हणजे process gap — procedure आहे, पण consistently follow होत नाही. Registration check करणं हे प्रत्येक colour change नंतर mandatory आहे. पण "आधी ठीक होतं" असं म्हणून skip होतं. Result: multi-colour job मध्ये misregistration दिसतं, text sharp नसतो, brand jobs reject होतात.

Skilled operator म्हणजे फक्त machine चालवणारा माणूस नाही  तो quality control चा पहिला gate आहे. Gate मजबूत असेल तर quality टिकते. Gate कमकुवत असेल तर बाकी सगळे systems असले तरी quality fail होतो.

2) Machine Condition – Maintenance नसेल तर Quality नाही

Machine चालू आहे म्हणजे machine चांगली आहे असं नाही. आणि machine चांगली आहे म्हणजे quality येते असंही नाही. हा फरक बरेच printing press owners समजत नाहीत  आणि इथूनच एक मोठा quality gap तयार होतो.

Blanket worn out असणं हे सर्वात common पण सर्वात दुर्लक्षित machine problem आहे. Blanket वर मायक्रो-लेव्हल compressibility असते. ती worn झाली की ink transfer uneven होतो. Output मध्ये काय दिसतं? Background patchy येतो. Solid colours मध्ये specks दिसतात. High-density areas मध्ये ink heavy आणि light पट्टे येतात. Client ला हे clearly दिसतं  आणि ते reject करतात. Press ला reprint द्यावा लागतो. Blanket replace करायचा खर्च ₹3,000 ते ₹8,000 असतो. Reprint चा खर्च ₹20,000 ते ₹30,000. हे equation समजलं की maintenance skip करण्याचं reason उरत नाही.

Ink आणि dampening roller setting चुकीची असणं हा दुसरा मोठा machine issue आहे. Roller pressure correct नसेल तर ink distribution uniform राहत नाही. Uneven ink distribution म्हणजे colour consistency नाही. एकाच sheet वर वेगवेगळ्या zones मध्ये density वेगळी दिसते. Wedding cards, annual reports, premium brochures — या जेवढ्या high-visibility jobs असतात, तेवढा हा problem जास्त critical असतो.

Gripper problem हा एक silent quality killer आहे. Gripper ने sheet proper hold नाही केली तर sheet मध्ये slight movement होतो printing दरम्यान. Result: multi-colour job मध्ये colours perfectly align होत नाहीत. Text sharp नसतो. Logo मध्ये fringing दिसतो. हे खूप subtle असतं  पण trained eye ला लगेच कळतं आणि client ते reject करतो.

Machine maintenance हा invisible quality factor आहे. म्हणजे maintenance नसेल तर quality problem visible होतो — पण maintenance असेल तर quality smooth राहते आणि कुणाला काहीच दिसत नाही. Preventive maintenance schedule असणं हे press च्या quality consistency साठी non-negotiable आहे.


3) Plate Quality – सुरुवात इथूनच होते.

Offset printing मध्ये plate म्हणजे quality चा foundation आहे. Foundation चुकीचा असेल तर वर काहीही बांधलं तरी ते stable राहणार नाही. Plate related quality problems हे pre-press stage मध्ये होतात  पण त्यांचा परिणाम final output मध्ये दिसतो.

Under exposure आणि over exposure हे सर्वात common plate problems आहेत. Under exposed plate मध्ये image areas properly hardened नसतात. Fine text आणि thin lines fill up होतात — मग ती print मध्ये sharp येत नाहीत. Sharpness गेली की brand jobs, visiting cards, letterheads reject होतात. Over exposed plate मध्ये highlight areas सुटतात. Gradients smoothly work करत नाहीत. Photography heavy jobs मध्ये halo effect येतो.

Plate scratches हा handling problem आहे. Plate vulnerable असतो  handling दरम्यान एक scratch आला तर तो directly print मध्ये दिसतो. Scratched plate वर solid background असलेल्या job मध्ये thin white line दिसते. एकदा plate press वर लागला की scratch दिसेपर्यंत शेकडो sheets waste होतात. Plate handle करताना gloves, dedicated storage, आणि careful transportation — हे basics miss केले तर quality fail inevitable असतो.

Storage problem हा दीर्घकालीन quality issue आहे. Plates humidity आणि light sensitive असतात. चुकीच्या storage मध्ये ठेवलेला plate लवकर degrade होतो. Oxidation झालेला plate print quality consistently maintain करू शकत नाही. Plate storage साठी dedicated space, controlled environment, आणि FIFO (First In First Out) system असणं गरजेचं आहे.


4) Paper Quality – सगळे paper सारखे नसतात

Printing मध्ये paper हा फक्त substrate नाही  तो quality चा active participant आहे. Paper चुकीचा असेल तर बाकी सगळं perfect असलं तरी final output disappointing येतो. हे reality बरेच print shop owners accept करत नाहीत,  कारण paper cost वर compromise करायची सवय असते.

Wrong GSM selection हे सर्वात basic पण महत्त्वाचं mistake आहे. एखाद्या job साठी 170 GSM art paper specify असेल आणि 130 GSM वापरला तर काय होतं? Paper thin असल्याने show-through येतो  म्हणजे back side चं print front side वर दिसतं. Double-sided premium jobs साठी हे completely unacceptable आहे. Client ने specifications दिल्या आहेत,  त्या follow करणं म्हणजेच quality commitment आहे.

Moisture content जास्त असणं हा एक seasonal problem आहे जो monsoon मध्ये India मध्ये खूप common आहे. Moisture absorbed paper press वर chalky दिसतो, ink absorption uneven होतो, आणि drying time जास्त लागतो. Humid paper मध्ये feeder misfeeds जास्त होतात,  wastage वाढतो आणि production speed कमी होते. Paper storage आणि paper conditioning  या दोन्ही गोष्टी quality साठी critical आहेत.

Grain direction ignore करणं हा एक expensive mistake आहे. Offset printing मध्ये paper ची grain direction cylinder च्या direction ला parallel असायला हवी. Grain चुकली तर काय होतं? Folded jobs मध्ये crack येतो,  booklet, brochure, hardcover binding मध्ये spine वर white crack lines दिसतात. Wedding invitations, premium catalogues reject होतात. Grain direction check करणं हे pre-press मध्ये mandatory step आहे,  हे skip केलं की output मध्ये दिसतं.


5) Process Discipline – Management चा Role

Quality problem नेहमी press floor वर दिसतो, पण मूळ कारण अनेकदा management level वर असतं. हे सत्य ऐकायला कठीण आहे,  पण हे सत्य आहे. Floor वर quality fail होतो कारण management ने योग्य systems तयार केलेले नसतात.

Job card incomplete असणं हे सर्वात basic management failure आहे. Job card मध्ये काय असायला हवं? Job name, quantity, paper specification, colour mode, finishing details, delivery deadline, client approval status, आणि special instructions. जर job card incomplete असेल तर operator assumptions वर काम करतो. Assumptions चुकतात  आणि quality fail होतो. "ते म्हणाले असतील" किंवा "नेहमी असंच करतो" हे quality-killing phrases आहेत.

Quality checklist नसणं हे process discipline चा सर्वात मोठा gap आहे. प्रत्येक job साठी check करण्याचे points define असायला हवेत: artwork approved? Colour proof signed? Paper GSM confirmed? Plate exposure correct? Make-ready ok? First copy approval केली? हे checklist नसेल तर प्रत्येक operator स्वतःच्या judgment वर काम करतो. वेगवेगळ्या operators साठी quality standards वेगवेगळ्या होतात. Consistency जाते,  आणि consistency नसणं म्हणजे quality नसणं.

Urgent jobs without planning हे quality चा सर्वात मोठा killer आहे. Client ने "आजच हवं" सांगितलं की प्रत्येक step skip होतो. Proof नाही, approval नाही, make-ready proper नाही, first copy check नाही. Job rush मध्ये print होतो,  आणि rush मध्ये झालेलं काम rarely perfect असतं. याचा result म्हणजे reprint, client complaint, आणि reputation damage. System नसल्यास quality luck वर चालते  आणि luck नेहमी साथ देत नाही.


6) Proofing stage skip केल्याबर काय होतं?

Proofing म्हणजे वेळ वाया घालवणं नाही,  proofing म्हणजे quality insurance आहे. हे एक simple equation आहे: एक proof made आणि approved म्हणजे एक potential rejection avoided. Rejection avoid करणं म्हणजे reprint cost वाचवणं, client trust टिकवणं, आणि delivery deadline meet करणं.

Proofing stage skip होण्याची तीन कारणे असतात. पहिलं म्हणजे time pressure — "proof करायला वेळ नाही, job urgent आहे." दुसरं म्हणजे cost concern  "proof चा खर्च जास्त." तिसरं म्हणजे overconfidence  "नेहमी अशीच job आहे, proof कशाला?" या तिन्ही कारणांमुळे proof skip होतो. आणि प्रत्येक वेळी proof skip केली की एक risk घेतली जाते.

एक real scenario बघा. Client ने logo file दिली. Operator ने assume केलं की file print-ready आहे. Proof केली नाही. Job print झाली,  10,000 leaflets. Client आला: "Logo colour wrong आहे. आमचा Pantone 485C आहे, हे process Red आहे." Reprint mandatory झाला. Paper ₹18,000, machine ₹2,500, labour ₹1,000 — total ₹21,500 चा loss. एका proof ची cost असती ₹500 ते ₹800. Proof केली असती तर हे problem pre-press मध्येच catch झालं असतं.

Proofing system म्हणजे फक्त print proof नाही. Digital soft proof, hard copy proof, colour bar check, client sign-off — हे सगळं एक robust proofing system बनवतात. जो press proofing seriously घेतो, त्या press मधून reprint practically eliminate होतो.


7)  Real Case Studies — Quality Fail प्रत्यक्षात कसं दिसतं

Case 1 — Wedding Card Colour Disaster: एका Pune press ने 500 wedding cards print केल्या. Client ने file WhatsApp वर पाठवली होती  "same design, just name change करा." Operator ने assume केलं की colour same असेल. Actually file RGB मध्ये होती, CMYK मध्ये नव्हती. Cards print झाल्या  colour completely different. Wedding सात दिवसांवर होती. Emergency reprint द्यावा लागला,  overtime charges सहित ₹14,000 extra. Client शांत राहिला, पण तो परत आला नाही. हा loss फक्त ₹14,000 नव्हता — तो long-term client चा loss होता.

Case 2 — Annual Report Blanket Problem: एका commercial press ने corporate client साठी annual report print केली. 200 pages, 4-colour, 1,000 copies. Job delivery झाली. Client च्या office मधून call आला: "Pages 45 ते 60 मध्ये background patchy आहे. Second half मधले pages ok आहेत." Press ने बघितलं  blanket mid-run मध्ये wear झाला होता. पहिल्या 500 copies ok होत्या, पुढच्या 500 मध्ये patchy आलं होतं. Spot reprint करावी लागली — 500 copies × 16 pages = significant loss. Blanket monthly check असती तर हे टळलं असतं.

Case 3 — Grain Direction Folded Brochure: एका marketing agency साठी 5,000 trifold brochures print झाल्या. High-end client, premium paper, 4-colour. Delivery नंतर agency ने call केला: "Folding मध्ये crack येतोय." Press ने sample मागवला,  सगळ्या तीन folds वर crack visible होता. Root cause: paper grain direction wrong होती. Machine direction च्या across grain होती, parallel नाही. सगळ्या 5,000 brochures reject. Complete reprint — ₹45,000 चा loss. Pre-press मध्ये grain direction check केली असती,  एक minute चं काम — तर हे झालं नसतं.


8. Quality Control Checklist — Job Suru करण्यापूर्वी

Quality fail टाळण्याचा सर्वात effective मार्ग म्हणजे प्रत्येक job साठी एक standard pre-press checklist follow करणं. हे checklist operator, supervisor, आणि owner या तिघांसाठी वेगळं असतं  पण सगळ्यांचं एकच goal असतो: first time right print.

Artwork check मध्ये हे confirm करा: file CMYK आहे का, resolution minimum 300 DPI आहे का, bleed आणि trim marks आहेत का, fonts embedded आहेत का, Pantone colours असतील तर CMYK convert झाले आहेत का.
Paper check मध्ये हे confirm करा: specified GSM आणि type आहे का, grain direction correct आहे का, paper press वर load करण्यापूर्वी condition केलेला आहे का, moisture normal range मध्ये आहे का.

Machine check मध्ये हे confirm करा: blanket clean आणि in good condition आहे का, roller pressure correct आहे का, gripper properly functioning आहे का, dampening system balanced आहे का.

Process check मध्ये हे confirm करा: colour proof approved आहे का, client sign-off आहे का, make-ready first copy checked आहे का, quantity confirmed आहे का.

हे checklist एकदा laminate करा आणि press वर लावा. प्रत्येक job साठी follow करा. यात 10 मिनिटे जातात — पण या 10 मिनिटांमुळे तास-भर reprint आणि हजारो रुपयांचा loss वाचतो.

9. Quality Failures चे Real परिणाम — फक्त Cost नाही

Quality failure चा impact फक्त reprint cost पुरता मर्यादित नाही. त्याचे wider consequences असतात जे कधीकधी cost पेक्षाही जास्त damaging असतात.

पहिला परिणाम म्हणजे reprint cost आणि paper wastage. हा direct, measurable loss आहे. Paper, ink, machine time, labour — सगळं double खर्च होतं. आणि original billing same राहते.

दुसरा परिणाम म्हणजे client trust damage. एकदा quality problem झाल्यावर client मनात एक प्रश्न येतो: "पुढच्या वेळी यांच्यावर विश्वास ठेवावा का?" हा प्रश्न कधीकधी client relationship संपवतो. Long-term client गेला तर वर्षानुवर्षे येणारं business जातं — एका quality failure मुळे.

तिसरा परिणाम म्हणजे word-of-mouth damage. Printing industry मध्ये referrals खूप important आहेत. एका client ने negative experience share केला की potential new clients येत नाहीत. भारतात आणि विशेषतः Pune, Mumbai सारख्या cities मध्ये printing community tight आहे — news लवकर पसरते.

चौथा परिणाम म्हणजे staff morale. Reprint झाली की operator ला माहीत असतं — कुठेतरी चूक झाली. Repeated reprints मुळे staff मध्ये helplessness येतो. "आम्ही काहीही केलं तरी problems येतातच" हा attitude येतो — आणि हा attitude quality साठी सर्वात dangerous आहे.

⌛Conclusion

Printing मध्ये quality fail अचानक होत नाही, आणि फक्त machine मुळेही होत नाही. Quality fail होतो operator error मुळे, machine maintenance neglect मुळे, poor planning मुळे, आणि weak process मुळे. या चारही कारणांवर control म्हणजेच quality control.

Quality म्हणजे system, discipline, आणि experience यांचा combination आहे. System म्हणजे checklist, SOPs, आणि approval process. Discipline म्हणजे ते consistently follow करणं  urgent job असो किंवा regular job. Experience म्हणजे problem आधी ओळखण्याची क्षमता  आणि ती येते फक्त प्रत्यक्ष प्रेस अनुभवातून.

एक action आजच घ्या. तुमच्या press साठी एक simple pre-press checklist तयार करा. पाच items पुरेत. Laminate करा. Press वर लावा. प्रत्येक job साठी follow करा. तीस दिवसांत quality complaints कमी होतील,  हे guarantee नाही, पण हा अनुभव आहे.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: Colour variation येतो पण machine नुकतीच serviced आहे — मग problem कुठे आहे?
Machine service नुकतीच झाली असली तरी colour variation येऊ शकतो — कारण colour variation चे multiple sources आहेत. Ink viscosity temperature नुसार बदलते. Dampening water च्या pH मध्ये variation असेल तर colour shift होतो. Operator ने run दरम्यान ink keys adjust केल्या नाहीत तर density drift होतो. Service नंतरही ink-water balance continuously monitor करावा लागतो — हे one-time fix नाही.

प्रश्न 2: Client ने proof approve केला होता तरी complaint करतोय — आता काय करायचं?
अशा वेळी signed proof record सर्वात महत्त्वाचा document आहे. जर digital approval असेल तर email/WhatsApp screenshot save करा. Physical proof असेल तर client signature असलेली copy press कडे असायला हवी. Proof approved आणि print त्याप्रमाणे झाली असेल तर technically press ची चूक नाही. Client ला tactfully proof दाखवा. मात्र, complaint resolve करण्यासाठी partial concession देणं long-term relationship साठी कधीकधी worthwhile असतं.

प्रश्न 3: Blanket किती वेळाने replace करावा?
Blanket replace करण्याचं कोणतं fixed time schedule नसतं — ते impression count आणि job type वर अवलंबून असतं. साधारण guideline म्हणजे प्रत्येक 500,000 ते 800,000 impressions नंतर किंवा visible wear दिसला की replace करा. Solid colours, high-density jobs जास्त blanket wear करतात. Monthly visual inspection mandatory आहे — glazed, hardened, किंवा cracked surface दिसला तर replace करा. Blanket ची compressibility regularly check करणं हे quality maintenance चा basic part आहे.

प्रश्न 4: Small print shop साठी proofing system practically कसा implement करायचा?
Small press साठी full soft proofing setup नेहमी affordable नसतो. पण basic proofing system possible आहे. Desktop colour printer वर proof print करा आणि client ला दाखवा — हे 100% accurate नसेल, पण layout, content, आणि rough colour check होतो. WhatsApp वर digital proof पाठवा आणि "OK" reply screenshot करा. Premium jobs साठी मात्र proper hard proof mandatory ठेवा. Proof नाही म्हणजे risk आहे — size काहीही असो.

प्रश्न 5: Operator ने चूक केली — त्याला जबाबदार धरायचं की system fix करायचं?
दोन्ही — पण order महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा system बघा: SOP होतं का? Checklist होतं का? Training दिली होती का? जर system नव्हतं, तर operator ला blame करणं unfair आहे. System fix करा. जर system होतं आणि operator ने follow नाही केलं, तर individual accountability आवश्यक आहे — but one-t

o-one, calm conversation मध्ये. Public blame quality culture destroy करतो. System + accountability या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर quality improve होतो.


Printing Business Transformation Core Series  :


🔹 Next Topic -07

Quality control झाला. पण काम चांगलं होतंय आणि तरीही महिन्याच्या शेवटी पैसे नाहीत — हे का होतं? पुढचा प्रश्न cash flow चा आहे.

Topic 07 — Printing Press मध्ये Cash Flow का अडतो? काम असूनही पैसे का नाहीत?

हा लेख Printing A to Z Marathi मालिकेतील एक भाग आहे. पुढील भाग दर रविवारी सकाळी प्रकाशित होतो.


प्रिंटिंग व्यवसाय सुरू करायचा किंवा वाढवायचा आहे? संपूर्ण मार्गदर्शनासाठी Homepage ला भेट द्या:
https://kraj008.blogspot.com/p/printing-business-guide-start-here.html  


📑हा Blog Follow करा. नवीन लेख miss होऊ देऊ नका.

👅अनुभवी सल्ला हवा आहे? Comment मध्ये फक्त लिहा: "GUIDE"


 


            📣 ज्ञान वाटलं तरच वाढतं — Share करा.




 I



Comments

Popular posts from this blog

Paper Cost Control : Basic Introduction

Free Printing Cost Calculator India (2026) – Costing + Quotation sheet

प्रिंटिंग व्यवसायात नवशिक्यांनी केलेल्या 10 मोठ्या चुका.