Paper Cost Control – Offset Printing मध्ये नफा कसा वाचवायचा?


Offset printing paper cost control example

Topic -3 
Paper Cost Control प्रेस मालकांनी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

Introduction:-

 “काम खूप आहे पण नफा नाही” Offset Printing मध्ये नफा कमी वाटत असेल, तर बहुतेक वेळा कारण असतं Paper Cost Control चा अभाव. माझ्या 30+ वर्षांच्या अनुभवात मी पाहिलंय, Paper नीट Manage केले तर नफा आपोआप वाढतो आणि Paper वाया जात राहिला तर चांगलं काम असूनही तोटा होतो. आज Paper Cost कसा control करायचा ते सोप्या, Practical मुद्द्यांत पाहूया.

1️Paper = Offset Printing मधला सगळ्यात मोठा खर्च

Offset Printing मध्ये: 50–60% खर्च Paper वरच होतो,

🔍 उदाहरण:

एका प्रेसला 1 लाख रुपयांचं काम मिळालं., Paper cost: ₹55,000, बाकी खर्च (ink, labour, electricity): ₹30,000

👉 एकूण खर्च = ₹85,000,  नफा = ₹15,000

आता समजा Paper Wastage मुळे ₹5,000 जास्त खर्च झाला, तर नफा थेट ₹10,000 वर येतो.

म्हणजे  Paper वरचा 5% error = नफ्यावर 30–40% परिणाम.

👉 Direct Profit Control


2️ योग्य Size Planning केल्याने Paper वाया जातो.

सामान्य चूक:

Job Size नुसार Paper Size Plan करणे  Standard Size वापरण्याऐवजी अंदाज.

🔍 उदाहरण:

Job: A4 leaflet (210 × 297 mm)  Paper घेतला: 25”×36” Proper Planning केल्यास एका sheet मधून 9 A4 निघू शकतात, Planning केल्यास: फक्त 8 A4 निघतात.

👉 फरक: 2 sheets प्रति paper वाया  हा खर्च Quotation मध्ये कुठेच दिसत नाही, पण नफा खातो.

 उपायJob ला योग्य Standard Sheet निवडा Cutting + Folding आधी Plan करा.

👉 एक sheet वाचली = अनेक रुपये वाचले.


3️) GSM चुकीचं निवडणं = Extra Cost pay 

Client म्हणतो:जरा जाड paper घ्या, Quality दिसायला हवी. पण प्रत्येक कामासाठी जाड GSM गरजेचं नसतं. 130 GSM ऐवजी 170 GSM = Cost वाढतो, उपयोग नाही

 उपाय: Job purpose समजावून client ला Guide करा. Sample दाखवा. 

📌 Client ला Quality कळत नाही,  पण तुमचा नफा नक्की कळतो.


4️) Grain Direction चुकली तर काय होतं? (प्रत्यक्ष अनुभव)

Grain Direction कडे दुर्लक्ष केल्यामुळे: 1) Folding Crack येतो, 2) Binding weak होतं, 3) Client job Reject करतो.


5️Excess Wastage – Silent Profit Killer

Wastage Control नसल्याने नफा कसा गळतो?

Wastage कुठे लागतो 1) Plate Setting, 2) Colour Matching, 3) Operator Carelessness

🔍 उदाहरण:

Normal wastage limit: 2–3%, Actual wastage: 6–7%

Paper cost ₹50,000 असल्यास: Extra wastage = ₹2,000–₹2,500

👉 महिन्याला 20 jobs,  ₹40,000–₹50,000 loss

📌 छोटा वाटणारा Wastage, महिन्याला मोठा तोटा करतो.

 उपाय: Fixed Wastage Limit ठरवा  Operator Accountability Reprint Analysis ठेवा.


6️) Short Quantity Paper खरेदी महाग का पडते?

तुकड्यात Paper घेणं: Rate जास्त- Quality Mismatch

🔍 उदाहरण:

Monthly Requirement = 1 Ton  तुकड्यात घेतलं = 3 वेळा 300–400 kg

👉 Rate फरक = ₹2–3/kg
👉 महिन्याचा extra खर्च = ₹2,000–₹3,000

📌 Planning नसणं म्हणजे खर्च वाढवणं.

 उपाय: Monthly paper planning, Common GSM stock ठेवा


7️) Job Wise Paper Record ठेवा

Job-wise Paper Record नसल्याने काय होतं? अनेक प्रेस ही चूक करतात: Job card आहे पण Paper वापराचा Record नाही

👉 कळतच नाही नफा कुठे गेला.

🔍 उदाहरण:

Client complain करतो:  तुमचं काम महाग आहे.

असका? कारण तुमच्याकडे Data नाही: किती Paper लागला, किती Wastage झाला.

👉 हे तुम्ही स्वतःच Defend करू शकत नाही.

📌 Record = Control
📌 Control = Profit

 उपाय: Job card वर Paper Issue Note करा. End of Job Wastage Check करा.


8️) Damaged / Old Paper Management

Damaged Paper Management नसेल तर काय होत?

Warehouse मध्ये: A) Moisture,  B) Dust,  C) Folding Damage.

👉 Paper वापरण्यायोग्य राहत नाही.

🔍 उदाहरण:

₹20,000 चा paper stock, 6 महिन्यांनी Unusable

👉 Scrap rate = ₹5/kg
👉 Actual loss = ₹12,000+

📌 Storage पण Costing चा भाग आहे.

 उपायFIFO (First in First Out)

Proper storage, Damaged Paper Small Jobs साठी वापरा


9️Client ला Paper Cost Transparent ठेवा

Client ला Paper Cost Transparent सांगणं का महत्त्वाचं?

Client ला वाटतं: Paper तर स्वस्त असतो, पण Printing Paper Rate रोज बदलतो.

🔍 उदाहरण:

Quotation मध्ये mention: “Paper Rate as Per Current Market”, Paper Rate वाढला तरी Client dispute कमी Trust वाढतो

📌 Clear communication = Safe profit

 उपाय: Paper rate openly explains करा, Quotation मध्ये Mention ठेवा.


Conclusion:

Offset Printing मध्ये: Paper फक्त Raw Material नाही Paper हा नफ्याचा कणा आहे.

Paper Cost Control म्हणजे  Planning, Awareness, Discipline, Experience.

जर Paper नीट control केला, तर नफा वाढवायला वेगळं काही करायची गरज पडत नाही.


🔹 Next Article (Topic No. 04)  

Client ‘Rate कमी कराम्हणाल्यावर काय करायचं? (Real Conversations सहित)

हा लेख Printing A to Z Marathi मालिकेतील एक भाग आहे. पुढील भाग दर रविवारी सकाळी प्रकाशित होतो.


👉 Offset Printing मध्ये नफा कसा ठरतो?  हा लेख वाचा  https://kraj008.blogspot.com/2025/12/offset-printing-printing-to-z-marathi.html    मध्ये नफा कसा वाचवायचा



हा विषय तुमच्या प्रेससाठी महत्त्वाचा वाटत असेल,तर अशाच practical printing insights

sidebar मधील consulting section मध्ये मिळतील.




Comments

Popular posts from this blog

प्रिंटिंग व्यवसायात नवशिक्यांनी केलेल्या 10 मोठ्या चुका.

Printing Press Cash Flow Problem: प्रिंटिंग प्रेसमध्ये पैसा का अडकतो?